बंद

आर.टी.एस.- लोकसेवा हक्क अधिनियम

आर.टी.एस.- लोकसेवा हक्क अधिनियम

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणा-या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि.28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उ‍द्दीष्ट आहे.

वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुध्द संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व व्दितीय अपिल करता येते व तरीही समाधान न  झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदास अधिका-यास प्रतिप्रकरण रु.5000/- पर्यंत दंड होऊ शकतो.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :-

भेट द्याhttps://aaplesarkar.mahaonline.gov.in

सेतू शाखा

स्थान : जिल्हाधिकारी कार्यालय | शहर : मुंबई शहर | पिन कोड : 400001
दूरध्वनी : 022-665232| ईमेल : gadmumbaicity[at]gmail[dot]com