महसूल पंधरवडा १ ते १५ ऑगस्ट २०२४
विषय – महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक 1 ऑगस्ट महसूल दिन पासून महसुल पंधरवडा – 2024 साजरा करणेबाबत…
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर आयोजित
महसुल पंधरवडा – 2024
(दि.01 ऑगस्ट, 2024 ते दि.15 ऑगस्ट, 2024)
* कार्यक्रम पत्रिका *
अ.क्र. | दिनांक व वेळ | कार्यक्रमाचे स्वरूप व नियोजन | संबंधित विभाग |
1 | 01.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“महसूल दिन साजरा करणे व महसुल पंधरवडा शुभारंभ”
” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”
खालील बाबींसाठी विशेष शिबीर आयोजन 1. अधिवास प्रमाणपत्र / राज्यातील जन्म दाखला. 2. सक्षम प्राधिकारी यांनी कुटूंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला निर्गमित करणे. 3. आधारकार्ड, रेशनकार्ड इत्यादीं बाबत माहिती देणे. 4. पोर्टल / मोबाईल ॲप/ सेतू सुविधा केंद्र, डेटा सेंटर सुरळीतपणे चालू ठेवणे. 5. महिला अर्जदार लाभार्थी यांना मार्गदर्शन करणे व सौजन्याची वागणूक देणे. 6. योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी उपाय योजना करणे. |
1. महिला व बालविकास विभाग
2. सामान्य प्रशासन विभाग |
2. | 02.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”
1. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा मार्फत लाभार्थ्यांची नोंदणी करणे. 2. योजनेचा लाभ अधिकाधिक युवकांना प्राप्त व्हावा यासाठी अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड इत्यादिंचे प्राधान्याने वाटप करणे. 3. लाभार्थी युवकांना मार्गदर्शन करणे. |
1. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
2. सामान्य प्रशासन विभाग |
3. | 03.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”
खालील बाबींसाठी विशेष शिबीर आयोजन 1. अधिवास प्रमाणपत्र / राज्यातील जन्म दाखला 2. सक्षम प्राधिकारी यांनी कुटूंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला निर्गमित करणे. 3. आधारकार्ड, रेशनकार्ड इत्यांदी बाबत माहिती देणे. 4. पोर्टल / मोबाईल ॲप/ सेतू सुविधा केंद्र, डेटा सेंटर सुरळीतपणे चालू ठेवणे. 5. अर्जदार लाभार्थी यांना मार्गदर्शन करणे व सौजन्याची वागणूक देणे. 6. योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी उपाय योजना करणे. 7. विशेष कक्षाद्वारे जेष्ठ नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व अर्ज करण्यासाठी सहकार्य करणे. 8. मुख्यमंत्री वयोश्री योजनेला व्यापक प्रसिद्धी देणे. 9. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा सोबत समन्वय साधून योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी उपाययोजना करणे. |
1. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
2. संजय गांधी योजना शाखा 3. सामान्य प्रशासन शाखा
|
4. | 04.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय”
1. विशेष मोहिम राबवून परिसर स्वच्छ करणे. 2. कार्यालयीन अभिलेखे व दस्तऐवज वर्गीकरण व व्यवस्थापन, निंदणीकरण व महत्वाच्या दस्त ऐवजांचे स्कॅनिंग व संगणकीकरण करण्यासाठी विशेष मोहिम राबवणे. 3. सेवा हक्क अधिनियम अधिसुचित सेवांचे फलक कार्यालयांच्या दर्शनी भागावर लावणे. 4. शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनतेस देणे. 5. विभाग प्रमुख व कर्मचारी माहिती पुस्तिका तयार करणे.
|
1. सामान्य प्रशासन शाखा
2. आस्थापना शाखा 3. अभिलेख कक्ष |
5. | 05.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“जमिन विषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन”
1. मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय भाडेपट्टाधारकां करिता भोगवटदार वर्ग-1 सत्ता हस्तांतरण प्रकरणाबाबत शिबीर आयोजीत करून मार्गदर्शन करणे. 2. मिळकत पत्रिकांचे तात्काळ एक दिवसात वितरण करणे. 3. आपले सरकार या पोर्टलवर प्राप्त तक्रारींची दखल घेऊन सदर तक्रारी निकाली काढणेबाबतची कार्यवाही करणे. 4. जमिन विषयक प्रलंबित तक्रारींचा निपटारा करणे.
|
1. महसूल शाखा 2. भूमापन व भूमी अभिलेख शाखा |
6. | 06.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“पाऊस आणि दाखले”
1. अवकाळी पाऊस/अतिवृष्टी/पूर यामुळे बाधीत व्यक्ती/कुटूंबांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 नुसार नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करणे. 2. प्रलंबित उत्पन्न, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, इत्यादी प्रमाणपत्र/दाखले तात्काळ प्रदान करणे.
|
1. सामान्य प्रशासन शाखा
2. नैसर्गिक आपत्ती नियंत्रण शाखा |
7. | 07.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“युवा संवाद”
युवा संवाद:- 1. एस एन डी टी महाविद्यालय , जय हिंद कॉलेज व सिद्धार्थ कॉलेज येथे कार्यालयातील पथकाद्वारे प्रत्यक्ष भेट देवून विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती तसेच विविध योजनांबाबतची माहिती देणे. 2. शासकीय योजनांच्या माहितीपत्रकांचे वाटप करणे. 3. ऑनलाईन दाखला प्रक्रियेंचा प्रचार प्रसार करणे. 4. नवमतदार नोंदणीबाबत युवकांमध्ये जनजागृती व मतदार नोंदणी करणे. 5. शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करणेसाठी विशेष मोहिम राबविणे. 6. प्रलंबित जात प्रमाणपत्र प्राधान्याने वितरीत करणे. |
1. सामान्य प्रशासन शाखा
2. निवडणूक विभाग 3. संबंधीत महाविद्यालय |
8. | 08.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“महसूल- जनसंवाद”
विशेष शिबीर आयोजन करून खालील नमुद मुद्यांवर कार्यवाही करणे. 1. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार स्तरावर प्रलंबित प्रकरणे/अपील प्रकरणे निकाली काढणे. 2. जमिन मालकी हक्क व इतर प्रश्नाबाबत तक्रार अर्ज निकाली काढणे. 3. जमिन विषयक नोंदी अद्यावत करणे.
|
1. महसूल शाखा 2. भूमापन व भूमी अभिलेख शाखा |
9. | 09.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“महसूल ई-प्रणाली”
1. ई-हक्क प्रणाली सह महसूल विभागाच्या उपलब्ध ऑनलाईन सुविधा बाबत जनजागृती शिबीर आयोजित करावे. 2. “आपले सरकार” या पोर्टलवर प्राप्त तक्रारींची दखल घेऊन सदर तक्रारी निकाली काढण्याबाबतची कार्यवाही करणे. |
रचना व कार्यपद्धती शाखा |
10. | 10.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“सैनिक हो तुमच्यासाठी“
1. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी समन्वय साधुन संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधीत प्रलंबित प्रश्न निकाली काढणे. 2. माजी सैनिकांशी संवाद साधणे. 3. कार्यालयातर्फे भूदल/नौदल येथे शिबिर आयोजित करून सैनिकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणे. |
जिल्हा सैनिक कल्याण विभाग, मुंबई शहर |
11. | 11.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन”
1. विविध प्रकारच्या आपत्तींना प्रतिबंध करण्यासाठी आणि तिच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना निश्चित करणे. 2. जिल्हयातील कोणत्याही आपत्तीला किंवा इशाराप्राप्त आपत्तीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कार्यक्षमतेच्या स्थितीचा आणि सज्जतेबाबतचा आढावा घेणे. 3. नैसर्गिक आपत्ती कक्षाद्वारे NDRF यांचेकडील मास्टर ट्रेनर यांच्याद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे. 4. स्वयंप्रेरणेने बचाव करणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी करणे व त्यांना ओळखपत्र वाटप करणे. 5. साहसी कामगिरी करणाऱ्या नागरीकांचा सत्कार करणे. 6. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन बाबत जनजागृती करणे.
|
नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष
|
12. | 12.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा”
1. दिव्यांग व्यक्ती करीता शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना/उपक्रमाबाबतची माहिती उपलब्ध करून देणे. 2. विशेष मोहिमेद्वारे महसूल विभागाशी संबंधीत विविध दाखले / प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे. 3. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने उपकरणांचे वाटप करणे. 4. अनाथ मुले/मुली यांना प्रमाणपत्रे देण्यासाठी व अनुज्ञेय लाभ मिळण्यासाठी महिला व बालविकास अधिकारी यांचे मदतीने विशेष मोहिम राबविणे. 5. उपरोक्त नमुद कामात सामाजिक संस्थांची मदत घेणे. |
1. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
2. महिला व बालविकास 3. सामान्य प्रशासन विभाग 4. नैसर्गिक आपत्ती नियंत्रण शाखा 5. संजय गांधी योजना शाखा |
13. | 13.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“महसूल अधिकारी/कर्मचारी” यांचेसाठी संवाद व प्रशिक्षण
1. महसूल संवर्गातील जिल्ह्यात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणे. 2. शासकीय योजनांचे तज्ञाद्वारे मार्गदर्शन 3. ताण-तनाव व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन. 4. ई-ऑफिसबाबत मार्गदर्शन/सादरीकरण
|
1. आस्थापना शाखा 2. रचना व कार्यपद्धती शाखा |
14. | 14.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“महसूल पंधरवडा वार्तालाप”
1. मा. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची संयुक्त पत्रकार परिषद 2. प्रसिद्धी माध्यमांना महसूल पंधरवडयात केलेल्या कामाबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देणे 3. “यशोगाथा” पत्रक तयार करणे.
|
|
15. | 15.08.2024
सकाळी 11:00 वा. ते सायं. 05:30 पर्यंत |
“महसूल संवर्गातील कार्यरत/ सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता समारंभ”
1. सांगता समारंभ आयोजित करणे. 2. उत्कृष्ट महसूल अधिकारी/ कर्मचारी यांचा गौरव – सन्मान करणे. 3. विभागस्तरावर आयोजित कला/साहित्य/क्रिडा स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करणे.
|
1. आस्थापना शाखा 2. रचना व कार्यपद्धती शाखा 3. अभिलेख कक्ष |
महसूल दिन साजरा करणे व महसुल पंधरवडा शुभारंभ” ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”