बंद

इतिहास

मुंबई शहराचे नाव येथील मातृदेवता मुंबा देवी या देवतेच्या नावावरून पडले आहे, पूर्वीचे कोळी लोक तीचे उपासक होते.

मुंबई शहर जिल्हा हे भारताच्या पश्चिम किना-यावर १८° ५२’ आणि १९° ०४’ उत्तर अक्षांक्ष आणि ७२° ४७’ आणि ७२° ५४’ पूर्व रेखांशादरम्यान वसलेले आहे. हे शहर पश्चिम आणि दक्षिणेला अरबी समुद्र आणि पूर्वेला ठाण्याची खाडी अशा प्रकारे तिन्ही बाजुंनी पाण्याने वेढलेले आहे. उत्तरेला मुंबई उपनगर जिल्हयाची सीमा आहे.

मुंबई शहर हे मुंबई महानगरपालिकेच्या दक्षिणेकडील भाग आहे, भारतीय सर्वेक्षण विभागानुसार या शहराने १५७.० चौ.किमी क्षेत्र व्यापलेले आहे आणि २०११ जणगणनेनूसार मुंबई शहराची लोकसंख्या ३०,८५,४११ एवढी आहे.

मुंबई जिल्हयाचे साक्षरतेचे प्रमाण ८९.२ टक्के आहे. मुंबई जिल्हयाचे लिंग प्रमाण ८३२ आहे.