महसूल सप्ताह 2023
विषय – महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक 1 ऑगस्ट महसूल दिन पासून महसूल सप्ताह साजरा करणेबाबत…
अ.क्र | दिनांक | कार्यक्रमाचे स्वरूप व नियोजन | कार्यक्रमाचे आयोजनाचे ठिकाण व वेळ |
1 | 01/08/2023 | महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ-
1. जात, अधिवास, उत्पन्नाचा दाखला, इ. प्रमाणपत्रांचे वाटप 2. संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप 3. मिळकत पत्रिकांचे वाटप, 4. मतदान नोंदणी प्रमाणपत्र वाटप, 5. उत्कृष्ठ अधिकारी/कर्मचारी यांना प्रशस्तीपत्रक देऊन गुणगौरव करणे. |
जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर
(नियोजन भवन) सायं 04:00 वाजता |
2. | 02/08/2023 | युवा संवाद:-
1. एस एन डी टी महाविद्यालय 2. जय हिंद कॉलेज 3. सिद्धार्थ कॉलेज वरील महाविद्यालयास या कार्यालयातील पथकाद्वारे प्रत्यक्ष भेट देवून केंद्र व राज्य शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, विविध योजनांबाबतची माहितीपत्रके वितरीत करून त्याबाबत प्रचार व प्रसिद्धी करणे व ऑनलाईन दाखला प्रक्रियेंचा प्रचार प्रसार करणे. 4. नवमतदार नोंदणीबाबत युवकांमध्ये जनजागृती करणे. |
वेळ सकाळी 11:00 ते सायं. 02:00 वाजता.
संबंधित महाविद्यालय |
3. | 03/08/2023 | एक हात मदतीचा
1. नैसर्गिक आपत्ती कक्षाद्वारे NDRF यांचेकडील मास्टर ट्रेनर यांच्याद्वारे आपत्ती व्यवस्थापनाची प्रशिक्षण देणे.
2. अधिकारी /कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करणे. |
नियोजन भवन, सकाळी 11:00 वाजता
नियोजन भवन, सकाळी 01:00 ते सायं.-05:00 |
4 | 04/08/2023 | जनसंवाद
1. मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय भाडेपट्टाधारकां करिता भोगवटदार वर्ग-1 सत्ता हस्तांतरण प्रकाराबाबत शिबीर आयोजीत करून मार्गदर्शन करणे. 2. मिळकत पत्रिकांचे तात्काळ एक दिवसात वितरण करणे. 3. आपले सरकार या पोर्टलवर प्राप्त तक्रारींची दखल घेऊन सदर तक्रारी निकाली काढणेबाबतची कार्यवाही करणे. 4. जेष्ठ नागरिकांशी संवाद साधणे. 5. प्रलंबित तक्रारीचा निपटारा करणे. |
वेळ
सकाळी 11:00 ते दु.02:00 दु.03:00 ते सायं. 05:00 वाजता.
वेळ स.11:00 ते सायं. 05:00 वाजता.
|
5. | 05/08/2023 | सैनिक हो तुमच्यासाठी –
1. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील समन्वय साधुन संरक्षण दलातील कर्मचा-यांचे महसूल विभागाशी संबंधीत प्रलंबित प्रश्न निकाली काढणे. 2. माजी सैनिकांशी संवाद 3. कार्यालयातर्फे army/Navy camp येथे शिबिर आयोजित करून प्रलंबित प्रश्न निकाली करणे. |
नियोजन भवन,
स.11:00 ते दु.02:00 |
6. | 06/08/2023 | महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद
1. महसूल संवर्गातील जिल्ह्यात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणे. |
नियोजन भवन, स. 11:00 ते दु.12:00
|
6. | 07/08/2023 | महसूल सप्ताह सांगता समारंभ
1. वत्कृत्व स्पर्धा , शुद्धलेखन वर्ग व ताणतणाव मुक्ती व्याख्यान 2. पथनाट्य व महसूल सप्ताह फलनिष्पती व सांगता समारंभ |
नियोजन भवन,
स.11:00 ते दु.02:00 दु. 03:00 ते सायं. 05:00 वा. |