Close

छायाचित्रण स्पर्धा २०२६

मुंबई पर्यटन छायाचित्रण स्पर्धा २०२६

छायाचित्रण स्पर्धा २०२६

मुंबई पर्यटनतर्फे सर्व छायाचित्रणप्रेमींना या छायाचित्रण स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई म्हणजे केवळ तिची प्रसिद्ध ठिकाणं नाहीत. इथली माणसं, गजबजलेले रस्ते, समृद्ध वारसा, संस्कृती, वास्तुकला, निसर्ग आणि रोजच्या आयुष्यातले असंख्य क्षण मिळून मुंबईची खरी ओळख घडते. आता तुमच्या नजरेतून मुंबईची गोष्ट एका फ्रेममध्ये सांगण्याची वेळ आली आहे!

मुंबई पर्यटनतर्फे सर्व छायाचित्रणप्रेमींना या छायाचित्रण स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

  • सादर करा: एक मूळ छायाचित्र
  • जिंका: पारितोषिक आणि प्रमाणपत्र
  • अंतिम तारीख: २२ सप्टेंबर २०२६
  • छायाचित्र ईमेल द्वारे पाठवा: mumbaitourism@maharashtratourism.gov.in
  • ईमेल मध्ये आपले नाव, संपर्क क्रमांक आणि छायाचित्राची स्पर्धेच्या विषयाशी सुसंगती दाखवणारे थोडक्यात वर्णन, हे नमूद करावे.
  • अधिक माहितीसाठी संपर्क: 9425717529

महत्त्वाची सूचना

स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेल्या छायाचित्रांचे कॉपीराइट हक्क MTDC कडे राहतील. ही छायाचित्रे मुंबई पर्यटनाच्या प्रचार, प्रकाशन तसेच इतर संबंधित वापरासाठी वापरली जाऊ शकते.