Special activities for Transgender under various schemes
तृतीय पंथीयांसाठी विशेष उपक्रम राबविणे अंतर्गत विविध योजनंच्या
शिबीराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर व सहायक
आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर यांच्या संयुक्त् विद्यामाने बुधवार
दिनांक 04/09/2024 रोजी सकाळी 10.30 ते सायं 05.00 या वेळेत
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर येथे करण्यात आले. सदर शिबीरामध्ये
शासनांच्या विविध योजनांचे लाभ देण्याकरीता आयोजन करण्यात आले
होते. त्यामध्ये आधार कॉर्ड, मतदार ओळखपत्र, राशन कॉर्ड, संजय गांधी
योजनाचे लाभ, तृतीय पंथी ओळखपत्र तसेच विविध दाखले त्यामध्ये
उत्पन्न् दाखला, अधिवास प्रमानपत्र, रहिवास प्रमानपत्र, ज्येष्ठ नागरिक
ओळखपत्र इत्यादी योजनाचे स्टॉल लावण्यात आले होते. सदर शिबीरास
अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शविली तथा लाभार्थी यांनी सदर योजनेचा
लाभ घेतला.